Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पंढरपुर तालुक्यातील मौजे मेंढापुर येथे औ‌द्योगिक वसाहत मंजूर करावी: आ.रणजितसिंह व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

प्रतिनिधी; पंढरपुर तालुक्यातील मौजे मेंढापुर येथे शासकीय मालकीच्या ३२२ एकर उपलब्द जागेवर औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या...

प्रतिनिधी; पंढरपुर तालुक्यातील मौजे मेंढापुर येथे शासकीय मालकीच्या ३२२ एकर उपलब्द जागेवर औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या संदर्भात आज मुंबई विधान भवन येथे उद्योगमंत्री मा.उदय सामंत साहेब यांची आ.रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली व तसे मागणीचेध पत्र दिले.
          सन २०११ चे जनगणनेनुसार पंढरपुर तालुक्याची लोकसंख्या सुमारे ४.४२,३६८ इतकी असून सद्यस्थितीत पंढरपुर शहर व ग्रामीण भागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तसेच पंढरपुर तालुक्यालगतच मोहोळ व माढा तालुका असुन या सर्व भागातील सुशिक्षित व कार्यकुशल बेरोजगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता येथील नव उ‌द्योजकांना संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ग्रामीण विकासाच्या राज्य शासनाच्या धोरणास अनुकूल सूक्ष्म, लघु व मध्यम उ‌द्योगांना प्रोत्साहन देणे. रोजगार निर्मिती करणे आणि प्रादेशिकदृष्ट्या संतुलित, पर्यावरणदृष्ट्या शाश्वत व सर्वसमावेशक औ‌द्योगिक वाढीस चालना देण्याच्या दृष्टीने येथे औ‌द्योगिक वसाहत (MIDC) होणे अत्यंत गरजेचे आहे.
        त्या दृष्टीने पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे (गट नं १२९(१७८३) १५ हे.५२ आर गट नं १३३(१७६९)-१७ हे.९२आर), (गट नं १४७ (१७७२) १६ हे.८३ आर), गट नं १४९(१७८१)-१६ हे.८३ आर (गट नं१५०(१७८२)-२१हे.९७ आर) गट नं १५१.१७ हे. ६२ आर. गट नं १५९.२२ हे. १४ आर असे १२८ हेक्टर ८३ आर (३२२ एकर) शासकीय मालकीची जमीन उपलब्ध आहे. सदर जमीनीची मालकी महाराष्ट्र शासनाकडेच असलेने इतर शेतक-यांची जमीन संपादित करावी लागणार नाही. तसेच या भागाच्या औ‌द्योगिक विकासासाठी पोषक पायाभूत सुविधा म्हणून पालखी मार्गासहीत पंढरपूरला जोडणाऱ्या महामार्गांचे जाळे. त्यामुळे निर्माण झालेली दळणवळणाची सुलभता, तसेच भिमा डावा कालवा व चंद्रभागा नदीतून सहज उपलब्ध होणारे पाणी व विजेची सुलभ वितरण प्रणाली या पायाभुत सुविधांची कुठलीही कमतरता भासणार नाही.
               पंढरपूर तालुक्यासह मोहोळ व माढा तालुक्यातील औ‌द्योगिक विकासाला चालना देऊन रोजगार निर्मितीबरोबर सर्वसमावेशक विकासाची गती वाढवण्यासाठी सदरची शासकीय जमीन औ‌द्योगिक वसाहतीला (MIDC) मिळून मौजे मेंढापुर ता. पंढरपुर येथे औ‌द्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्यासंदर्भात आ.रणजितसिंह व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांना विनंती केली. तालुक्यातील मौजे मेंढापूर ता. पंढरपूर येथे औ‌द्योगिक वसाहत मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली.